ऋषिकेश होळीकर, लातूर: लातूर शहरात मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मित्रानेच जुनी कुरापत उरकून काढत मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका मित्राने दुसऱ्या मित्राला चाकूने भोसकून भर रस्त्यात खून केला आहे. लातूर शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहेत. निवडणुकीच्या काळात लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख प्रचार सभा संपवून त्यांच्या मूळ गावी म्हणजे बाभळगाव निघाले असताना खुनाची घटना नुकतीच घडली होती, ते आयत्यावेळी त्या ठिकाणी आल्याने पोलिसांना तात्काळ त्यांनी सूचना दिल्या. त्यांच्यासमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदेला रिक्षात बसून त्याच्या मित्रांनी लातूरच्या स्वरूपच्या रुग्णालयामध्ये दाखल केले उपचार दरम्यान प्रज्वल शिंदे याचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली.
'बऱ्याच दिवसापासून तू माझ्या डोक्यात बसलास..'
लय दिवसापासून तू मझ्या डोक्यात बसलास, असे म्हणत २९ वर्षीय तरुणावर त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने छातीत, बरगडीत, पोटात आणि मानेवर चाकूने भोसकून खुन केल्याचा प्रकार रात्री उशिरा समोर आला आहे. एकामागे एक वर्मी घाव बसल्यानंतर जमिनीवर कोसळलेल्या तरुणाची अवस्था बघुन 'गोट्याची विकेट पडली, पळ...' असे म्हणत फरार झालेल्या दोघांना पहाटे २.३० वाजता अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झाला तेव्हा हे दोनही आरोपी नशेत असावेत अशी माहिती समोर आली आहे.

Post a Comment